News

नाईन फिशमध्ये जीन सुक आणि विलास शिंदे

मुंबईच्या भायखळा येथील ‘नाईन फिश आर्ट’ गॅलरीमध्ये ज्येष्ठ चित्रकार विलास शिंदे आणि त्यांच्या पत्नी जीन सुक शिंदे यांचं ‘ओब्सर्वर’ हे चित्र प्रदर्शन दि 07 ते 15 एप्रिल  2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

विलास शिंदे हे मूळचे साताऱ्याचे रहिवासी. जेजे स्कूल ऑफ आर्ट येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पॅरिस मधून आपलं पुढील शिक्षण घेतलं. पॅरिसमध्ये त्यांनी प्रोफेसर हेटर यांच्याकडे प्रिन्टमेकिंगचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर युनाइटेड किंग्डममधील ग्लासगो प्रिंट सेंटर इथं त्यांना आमंत्रित करण्यात आलं.

शिंदे यांच्या अमूर्त शैलीत चित्रांमध्ये निसर्गातील आनंदरस चित्रित केले जातो. शिंदे आपल्या चित्रांमध्ये रंगांचा मेळ साधण्याचा प्रयत्न करतात. त्यात वेगवेगळ्या रंगछटांनाही महत्व असतेच. जसे सप्तसुरांचा मेळ साधून सरगम तयार होते पण त्यात एकेकट्या सुरांचेही आपले एक महत्व असते.

जीन सुक या मूळच्या कोरियन चित्रकार विलास शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी पारंपरिक कोरियन चित्रण पद्धती आणि समकालीन चित्रकला या दोन्हीमध्ये परिश्रमपूर्वक गुणवत्ता प्राप्त केली. त्यांनीही प्रोफेसर हेटर यांच्याकडे प्रिन्टमेकिंगचं प्रशिक्षण घेतलं. कोरियन पार्श्वभूमी असली तरी अनेक वर्षाच्या भारतातील वास्तव्यामुळे त्यांच्या चित्रांच्या प्रेरणा भारतीय निसर्गामधून येतात.

विलास शिंदे आणि जीन सुक शिंदे यांचे हे चित्र प्रदर्शन कला रसिकांसाठी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 7:30 या वेळेत खुले असेल.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.