News

जेजेचे झाले आझाद मैदान

‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या १६६ वर्षाच्या इतिहासात कधी घडली नसेल अशी घटना आज जेजे परिसरात घडली. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सध्या सुरु आहे. (हा मजकूर लिहीत असताना तो मागे घेतल्याची बातमी देखील काही क्षणांपूर्वी वाहिन्यांवर झळकू लागली आहे) फोर्ट परिसरातील असंख्य सरकारी कर्मचारी (ती संख्या ५०० पर्यंत पोहोचली असावी असे प्रत्यक्षदर्शी सांगतात) चक्क जेजे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरातील अप्लाइड आर्ट आणि प्रिंटिंग टेक्नोलोजी इमारती समोरच्या मोकळ्या जागेत जमले होते. खरं तर ही मंडळी चुकून इथं आली की काय ? असा प्रश्न अनेकांना पडला. कारण आझाद मैदान इथून चार आठ फर्लांगभर अंतरावर आहे. आणि मोर्चेकऱ्यांना तिथं जाण्यास आणि आंदोलन करण्यास सरकारनं पूर्ण मुभा दिलेली आहे. असे असताना या मंडळींना जेजे कॅम्पसमध्ये पाहून अनेकजण चक्रावून गेले. त्यातल्या काहींनी त्या मोर्चेकऱ्यांना विचारलं देखील. त्यावर मोर्चेकऱ्यांनी दिलेलं उत्तर ऐकून ते सारे थक्क झाले. ते म्हणाले ‘आम्हाला ठाऊक आहे आझाद मैदानावर मोर्चा न्यायचा असतो ते. पण आम्ही आझाद मैदानावर गेलोच नाही.

आम्ही थेट जेजेमध्येच आलो कारण आम्हाला ‘कला संचालनालय कर्मचारी संघटना (नियोजित) या संघटनेला मदत करायची होती. त्यांना मार्गदर्शन करायचं होतं. म्हणून आम्ही इथं आलो.’ त्यावर प्रश्न विचारणाऱ्यानी त्यांना टोकलेच ‘कला संचालनालयातील चाळीस पन्नास कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इतके लोकं ? पाचशे सहाशे ?’ हो मग त्यात काय झालं ! आम्ही आमच्या कर्मचारी बंधूना मदत करायला यायला नको ? आम्हाला कोण अडवणार आहे ? सरकारचंच तर कॉलेज आहे. ‘हो पण सरकारी कॉलेज जरी असलं तरी कंपाउंडमध्ये घुसून तुम्ही आंदोलन करू शकत नाही. तशी परवानगी कुठलंही सरकार कर्मचाऱ्यांना देत नाही. आणि शिक्षण संस्थेमध्ये घुसून असं काही करणं हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. त्यातच ज्या परिसरात तुम्ही जमला आहात आणि मोठं मोठ्यानं घोषणा देत आहात तो परिसर शैक्षणिक परिसर आहे. आणि आजूबाजूच्या तीनही इमारतींमध्ये विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरु आहेत. अगदी अंजुमन इस्लाम मध्येही परीक्षा सुरु आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का ? यावर तो मोर्चेकरी गप्प बसला, काही बोलला नाही. आणि पाचशे सहाशे जणांचा घोळका मोठं मोठ्यानं घोषणा देतोय हे पाहून प्रश्न विचारणाऱ्यांनं देखील तेथून काढता पाय घेतला.

या संदर्भात अधिक चौकशी केली असता ‘कला संचालनालय कर्मचारी संघटना’ (नियोजित) यांच्या वतीनं कला संचालक राजीव मिश्रा यांना सकाळी कार्यालय सुरु होताच एक लेखी पत्र देण्यात आलं. ज्यात ‘संपकरी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बृहन्मुंबई राज्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. मुंबईतील संलग्न संघटनांचे ८० ते १०० प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे’ अशा आशयाचं पत्र देण्यात आलं. या पत्रांवर अध्यक्ष सुरेश पवार, उपाध्यक्ष शारदा वीरकर आणि सरचिटणीस सतीश जाधव यांच्या सह्या आहेत. या पत्राला प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी अर्थातच संपूर्णतः नकार दिला. पण कला संचालनालयातील कर्मचाऱ्यांनी कला संचालकांचा निर्णय धाब्यावर बसवून जेजे स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा चालू असतानाच मोर्चा आणला. मोर्चात ८० ते १०० नव्हे तर सुमारे ५०० ते ६०० पेक्षाही अधिक कर्मचारी उपस्थित होते. आपण एका शैक्षणिक परिसरात परवानगीविना शिरलो आहोत इतकंच नाही तर तिथं विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असतानाच मोठं मोठ्यानं घोषणा देऊन शांतता भंग करत आहोत याच कुठलंही भान त्यांना असल्याचं आढळून आलं नाही. त्यांचं वर्तन हे अत्यंत बेजबाबदारपणाचं होतं.

या संदर्भात अधिक चौकशी केली असता अशी संघटना अलीकडेच स्थापन झाल्याचे सांगितले गेले. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की लेटरहेडवर ‘नियोजित’ असा शब्द मिरवणाऱ्या या संघटनेतील नुकतेच नोकरीला लागलेले काही कर्मचारी देखील या संपात सहभागी झाले होते. दोन तीन तर हंगामी कर्मचारी देखील या संपात सहभागी झाले असल्याचे बोलले जात होते. मुख्य म्हणजे ज्यांना पेन्शन योजना लागू आहे असे देखील काही कर्मचारी या संपात सहभागी झाले होते अशी माहिती जेजे परिसरातील कर्मचाऱ्यांनी ‘चिन्ह’ला दिली.

सकाळी पावणे अकराच्या सुमारास लोकं येण्यास सुरुवात झाली अकरा साडेअकरापर्यंत जेजेशी आयुष्यात सुतराम संबंध देखील आला नसेल असे ५०० पेक्षा अधिक कर्मचारी जेजे कंपाउंडमध्ये येऊन दाखल झाले. त्यांच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. कुणीतरी या आंदोलनाचे फोटो काढले आणि व्हाट्सअप ग्रुप्स वर टाकले आणि नंतरच्या पाचच मिनिटात ते अक्षरशः व्हायरल झाले. ‘चिन्ह’ला देखील अनेकांनी हे फोटो फॉरवर्ड केले. फॉरवर्ड करणाऱ्या बहुतेकांनी ते आंदोलन पाहून संताप व्यक्त केला होता. बहुतेकांचं म्हणणं होतं ‘चिन्ह’नं या संदर्भात आवाज उठवावा.

सकाळी पावणे अकराच्या सुमारास लोकं येण्यास सुरुवात झाली अकरा साडेअकरापर्यंत जेजेशी आयुष्यात सुतराम संबंध देखील आला नसेल असे ५०० पेक्षा अधिक कर्मचारी जेजे कंपाउंडमध्ये येऊन दाखल झाले. त्यांच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. कुणीतरी या आंदोलनाचे फोटो काढले आणि व्हाट्सअप ग्रुप्स वर टाकले आणि नंतरच्या पाचच मिनिटात ते अक्षरशः व्हायरल झाले. ‘चिन्ह’ला देखील अनेकांनी हे फोटो फॉरवर्ड केले. फॉरवर्ड करणाऱ्या बहुतेकांनी ते आंदोलन पाहून संताप व्यक्त केला होता. बहुतेकांचं म्हणणं होतं ‘चिन्ह’नं या संदर्भात आवाज उठवावा.

जेजेमध्ये आज लागलेले हे फलक. आता यांचा आणि जेजेचा काय संबंध?

काही आठवड्यांपूर्वी कला संचालनालयातल्या याच संघटनेनं कला संचालकांची परवानगी न घेता जेजे सारख्या जागतिक महत्वाच्या शैक्षणिक संस्थेच्या शांत परिसरात मोठमोठ्यानं डीजे वगैरे लावून क्रिकेटची मॅच खेळून स्पोर्ट्स डे साजरा करण्याचा पराक्रम घडवून आणला होता त्याची बातमी ‘चिन्ह’नं अगदी ठळकपणे दिली होती बहुदा असंख्य वाचकांनी ‘चिन्ह’कडे त्याच अपेक्षेनं हे फोटोग्राफ फॉरवर्ड केले असावेत. त्यांची ही अपेक्षा ‘चिन्ह’ अर्थातच वाया जाऊन देणार नाहीये. किंबहुना आम्ही तर असं म्हणतो की या प्रकरणाची शिक्षण सचिवांनी अतिशय गंभीरपणे दखल घेऊन अत्यंत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. आधीच कला संचालनालयाची सर्व व्यवस्था मोडकळीला आलेली आहे, ती मोडकळीस येण्यात या कर्मचाऱ्यांचा अर्थातच मोलाचा वाटा आहे .आणि म्हणूनच यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई केली जावी अशी अन्य जेजेप्रेमींप्रमाणे आमचीही मागणी आहे.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.