News

जेजे स्कूल : वार्षिक प्रदर्शन

‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चे वार्षिक प्रदर्शन दि १४ ते २१ मार्च २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या दरम्यान भरगच्च कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. दि १४ मार्च रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता ज्येष्ठ चित्रकार दिलीप रानडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. याप्रसंगी चित्रकार उदय घरत आणि शिल्पकार अरुणा गर्गे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

१५ मार्च ते २१ मार्च दरम्यान सकाळी १०.०० ते संध्या. ०६.०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहिल. १५ मार्च रोजी विद्यार्थ्यांचा फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. दि १६ रोजी दिवसभरात प्रकाश सोनावणे, शशांक म्हशीलकर, राजेंद्र पाटील यांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ मार्च रोजी संध्याकाळी पं. उपेंद्र भट यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्च रोजी लँडस्केप स्पर्धा आणि कलावेध वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.