News

‘जेजे जगी’ पाडव्याच्या सुमारास प्रकाशित होणार !

‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ आणि डिनोव्हो या संदर्भात मुंबईतल्या दोन वृत्तपत्रात जाणीवपूर्वक प्रश्नार्थक बातम्या दिल्या जात आहेत. त्यात यांचा काय हेतू आहे कुणास ठाऊक ? पण त्यामुळं कुणाला डिनोव्होमध्ये खोडा घालता येईल असं जर वाटत असेल त्याला मूर्खपणाच म्हणायला हवे. या संदर्भात डिनोव्होशी संबंधित कार्यकर्त्यांमध्ये एकमताने असं ठरलं होते की इतक्यात घाईनं काही बातम्या देऊ नयेत. सारे काही म्हणजेच थेट उद्घाटन समारंभापर्यन्तचं मार्गी लागताच आपण सर्व माहिती माध्यमांना देऊ, पण बहुदा या डिनोव्होशी संबंधित एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला आपण काही मोठे कार्य करतो आहोत असे दाखवण्याची उबळ आली असावी. आणि त्यातून त्या बातम्या दिल्या गेल्या असाव्यात. तूर्त त्यावर इतकेच.

डिनोव्होचे सारे प्रकरण मार्गी लागल्यावर आता जेजेची साफसफाई सुरु झाली आहे हे, एव्हाना ‘चिन्ह’च्या वाचकांना लक्षात आले असेलच. त्यामुळेच आता ‘जेजे जगी जगले’ या खूप रखडल्या ग्रंथाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत मी स्वतःला पूर्णपणे अडकवून घेतले आहे. १ मे महाराष्ट्र दिनापूर्वी, बहुदा गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर तो प्रकाशित होईल. डिनोव्होच्या उद्घाटन समारंभाच्या जवळपास हा ग्रंथ प्रकाशित करावा अशा अनेक चित्रकार मित्रांच्या सूचना आहेत. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.

एवढे मात्र निश्चित की या ग्रंथासाठी ‘चिन्ह’नं काहीही करायचं शिल्लक ठेवलेलं नाही. आधी योजिला होता त्यापेक्षा दुप्पट मजकूर या ग्रंथात प्रकाशित होणार आहे. १८५७ ते २०२३ असं एक मोठं आवर्तन आता पूर्ण झालं असून या कालखंडातल्या अनेक सोनेरी घटना या ग्रंथात वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रंथीत करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या संदर्भातली सर्व माहिती आता आठवड्यातून किमान तीन वेळा आम्ही प्रसारित करणार आहोत.

या ग्रंथाची संपूर्ण आवृत्ती आधीच नोंदवली गेली असल्यामुळं आता नवीन नोंदणी करता येणार नाही या बद्दल आम्ही दिलगीर आहोत. या संदर्भातले सर्व अपडेट्स चिन्ह’ची वेबसाईट, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि ट्विटरवर प्रसारित होणारआहेत. त्याच प्रमाणे ज्यांनी मागणी नोंदवली आहे त्यांना देखील एका विशेष व्हाट्सअप ग्रुप मार्फत व्यक्तिशः माहिती पाठवली जाणार आहे. आता तुमच्या शुभेच्छांची आम्हाला आवश्यकता आहे. आता आपण भेटूया येत्या शुक्रवारी त्यात या अंकातल्या लेखांची संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत.

*****

– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.