News

आरोग्य खात्यातर्फे कलाकारांना नोकरीची संधी !

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे कलाकार / छायाचित्रकार या पदासाठी जागा भरण्यात येत आहेत. उपयोजित कलेमध्ये पदवीचे शिक्षण घेतलेला उमेदवार या पदासाठी पात्र ठरतो. यासोबत उमेदवाराचा जाहिरात आणि फोटोग्राफी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव ग्राह्य धरला जातो. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 मे 2023 आहे. या पदभरतीसाठी शासनातर्फे ऑनलाईन परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवार खालील वेबसाईटवर या पदभरतीचे नियम आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल अधिक माहिती घेऊ शकतात.
www.med-edu.in

अनेक कलाकारांना आरोग्य क्षेत्रातील कलाकार या पदाबद्दल माहिती नसते. पण ज्यांना या कलाकारांसाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य खात्यातील सरकारी पदाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांनी ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी चित्रकार कृष्णा पाटील यांच्याशी ‘पॅलेट’ या कार्यक्रम संवाद साधला आहे तो जरूर पाहावा.
या कार्यक्रमाची लिंक खाली दिली आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.