News

महा अनुभवमध्ये कातळचित्रांवर लेख

यंदाच्या महा अनुभव दिवाळी अंकात सुहास गुर्जर यांनी कातळचित्रांवर माहिती देणारा लेख लिहिला आहे. कोकणातील कातळचित्रांवर सतीश लळीत, सुधीर रिसबूड, सुरेंद्र ठाकूर देसाई, धनंजय मराठे आणि पुरातत्व संचालक तेजस गर्गे यांनी बरेच संशोधन केले आहे. आधी फक्त स्थानिक नागरिकांच्या गावगप्पांमध्ये माहित असलेली ही महत्वाची चित्रे प्रकाशात आणून त्यांचं रीतसर डॉक्युमेंटेशन करण्याचं काम या मंडळींनी केलं आहे. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी या गूढ मूर्त/अमूर्त चित्रांची कोकणच्या जांभ्या खडकांवर आदिमानवाने निर्मिती केली. पुरातत्वीय दृष्टया ही चित्रे महत्वाची तर आहेतच पण स्वतंत्र कलाकृती म्हणूनही यांचं एक वेगळं महत्व आहे. आदिमानवही अतिशय उत्तम दर्जाची कला निर्मिती करत होता तेही एवढ्या प्रचंड अशा नैसर्गिक कॅनव्हासवर हे या लेखातून आपल्याला समजून येते. तसेच आदिमानवाने ही चित्रे का तयार केली असावीत या प्रश्नाचा वेधही या लेखात घेतला आहे. कोकणात आज न आढळणाऱ्या हत्ती पक्षी, हत्ती, कांगारूसदृश्य चित्रांची निर्मिती का केली असावी हा प्रश्नही आपल्याला हा लेख वाचल्यावर पडतो.


हा लेख वाचून एकदा तरी ही कातळ शिल्पे पाहण्याची इच्छा होईलच. त्यामुळे महा अनुभव दिवाळी अंकातील हा कलाविषयक लेख जरूर वाचा.

महा अनुभव दिवाळी अंक २०२२
पृष्ठसंख्या : १९६
अंकाची किंमत : २५०
अंक मागवण्यासाठी ९९२२४३३६१४ या क्रमांकावर संपर्क साधा.

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.