News

‘रंगा येई वो’ मध्ये महेश आंजर्लेकर

चित्रकार आणि शिल्पकार महेश आंजर्लेकर यांची मुलाखत  सह्याद्री वाहिनीवर येत्या ६ ऑगस्ट रोजी प्रसारित होणार आहे.

सह्याद्री वाहिनीवरील ‘रंगा येई वो’ या लोकप्रिय कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकारांच्या, शिल्पकारांच्या रंगतदार मुलाखती प्रसारीत केल्या जातात. या मुलाखतीच्या आगामी भागात प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार महेश आंजर्लेकर यांची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. मीना नाईक यांनी ही मुलाखत घेतली आहे. ६ ऑगस्ट शनिवारी सायंकाळी ५ वाजता ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार असून ७ ऑगस्ट दुपारी २ वाजता आणि रात्री ८.३० वाजता या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण होणार आहे. त्याचबरोबर सह्याद्री वाहिनीच्या  You Tube Channel वर आणि Facebook पेजवर देखील तुम्ही ही मुलाखत पाहू शकता.

कोकणातील निसर्गरम्य अशा हर्णे गावचे महेश आंजर्लेकर यांनी रहेजा स्कूल ऑफ एप्लाइड आर्ट्स मधुन पदवी घेतली आहे. गेली २० ते २५ वर्षे ते ऍडव्हटायजींग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. हे काम सांभाळून चित्रकला आणि शिल्पकला विषयातील कामही सुरू असते. मार्च- एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी दापोली येथे जांभ्या दगडातील शिल्पकलेच्या १० दिवसांच्या कॅम्पचे आयोजन केले होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील  २० आर्टीस्ट्स यामध्ये सहभागी झाले होते. जागतिक पातळीवर जांभ्या दगडामध्ये शिल्प घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेले हे पहिले काम होते असे म्हणता येईल.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.