News

नॅशनल गॅलरीत ललिता लाजमी यांना श्रद्धांजली

ललिता लाजमी यांचं १३ फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झालं. मागील महिन्यापासून नॅशनल गॅलरीत त्यांच्या चित्रांचं सिंहावलोकन प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनाचं संयोजन सुमेश शर्मा यांनी केलं आहे. दि १७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांना श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात अनेक मान्यवर ललिता लाजमी यांच्या आठवणी जागवतील. यामध्ये चित्रकार शकुंतला कुलकर्णी, ललिता लाजमी यांचा मुलगा देविदास लाजमी, गॅलरिस्ट शिरीन गांधी, चित्रपट निर्मात्या किरण राव, संयोजक सुमेश शर्मा सहभागी होतील. कार्यक्रमाची सांगता संध्याकाळी साडेपाच वाजता होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रदर्शनाच्या संयोजक टीमने पूर्ण प्रदर्शन वॉक थ्रूचे आयोजनही केले आहे.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.