News

जे जे आणि दादांचा धडाका

पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या कार्यालयात जेजेला डिनोव्हो दर्जा देण्यासंदर्भात एक विशेष बैठक बोलावली होती. या या बैठकीसंदर्भात ट्विटरच्या चंद्रकांतदादांच्या अकाउंटवर जी छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत त्यात नाट्य चित्रपट अभिनेते मनोज जोशी , जे जे उपयोजित कलचे प्रभारी अधिष्ठाता संतोष क्षीरसागर , अध्यापक शुभानंद जोग आणि जे जे स्कूल ऑफ आर्टचे ज्येष्ठ कला शिक्षक जॉन डग्लस आणि अर्थातच शिक्षण सचिव विकासचंद्र रस्तोगी हे उपस्थित होते असे दिसते .

या बैठकीत ‘डिनोव्हो दर्जा देण्यासाठी सर्व मंजुऱ्या मिळाल्या असताना एवढा उशीर का होतो आहे?’ अशी विचारणा चंद्रकांतदादांनी केल्याचे कळते. बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वांनीच काय अडचणी आहेत त्यांचा पाढा वाचल्यानंतर दादांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे असे समजते . इतकंच नाही तर राज्य सरकारने जे जे करायचे आहे त्या संदर्भातील सर्वच मागण्यांना चंद्रकांतदादा यांनी संमती दर्शवल्याचे कळते . त्यासाठी त्यांनी काही कालमर्यादा देखील घालून दिल्याचे देखील कळते.

जेजे परिसरात जे काही चालले आहे ते सारेच आपल्याला अवगत आहे असे दादांनी संबंधितांना सांगितल्याचे कळते . या संदर्भात पहिले पाऊल कधी उचलले जाईल ते आता पाहायचे .

****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.