News

एका मोटारमनचा कलाआस्वाद !

दरवर्षी प्रत्येक दिवाळी अंकात चित्रकलेवर काही ना काही लिखाण प्रसिद्ध होत असतेच . पण दर्जेदार म्हणता येईल असं त्यातून फार थोडंच गवसतं . यंदाच्या दिवाळी अंकामध्ये असाच एक दर्जेदार लेख सापडला. तो म्हणजे मुक्त संवाद दिवाळी अंकातील गणेश मनोहर कुलकर्णी यांचा ‘दृष्टीदायी चित्र – शब्द ऐवज’ हा लेख. ‘चिन्ह’मध्ये आम्ही दिवाळी अंकातील चित्रकला विषयक लेखांचा परिचय देत आहोत. त्यानिमित्त अनेक लेख वाचून होत आहेत. पण प्रस्तुत लेख वाचून अतिशय आनंद झाला. कारण हा लेख केवळ दृक चिंतन या पुस्तकाचा परिचय नाही तर एकूणच चित्र समज वाढेल असे बरेच मुद्दे या लेखात आहेत.

अनेक कला समीक्षकांना असं वाटत की शब्द जंजाळ उभं केलं म्हणजे आपण काहीतरी फार ग्रेट लिहिलंय. पण यामुळे खरं तर चित्रकला क्षेत्राचंच त्यातून त्यातून नुकसान होतं. आधीच कलेला दूर ठेवणारा रसिक चित्रकलेपासून अजूनच दूर जातो. पण प्रस्तुत लेखामध्ये लेखकाने अतिशय सोप्या आणि रसाळ भाषेत दृक चिंतन पुस्तकाचं रसग्रहण केलं आहेच पण चित्रकलेबाबत ‘चार गोष्टी युक्तीच्या’ अगदी सोप्या आणि सुंदर भाषेत मांडल्या आहेत.

लेखक कुलकर्णी खरं तर रेल्वेत कार्यरत आहेत. पण चित्रकलेची आवड असल्याने ते चित्रकलाविषयक वाचन करतात.हा आवडीचा प्रवास कसा सुरु झाला याबद्दलही सदर लेखात माहिती आहे. लेखाची सुरुवात आपल्या आवडीपासून सुरु करून पुढे दृक चिंतन पुस्तकातील महत्वाच्या लेखांचा थोडक्यात परिचय कुलकर्णी यांनी करून दिला आहे. कलेबाबत आपला समाज किती उदासीन आहे याबाबद्दल काही मुद्दे आणि किस्से या लेखात आपल्याला वाचता येतील. दृक चिंतन पुस्तकातील देगा, पिकासो, अंबादास , हुसेन, मनजीत बावा या कलावंतांवर जे लेख आहेत त्यातील मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत .

अंबादास यांच्यावर दलित असल्यामुळे जो अन्याय झाला याबद्दल या लेखात माहिती मिळते. अस्पृश्य असल्यामुळे अंबादास यांना पंगतीतून उठवण्यात आले होते. त्यामुळे आयुष्यभर ते पंगतीशिवायचा माणूस शोधत राहिले. अंबादास नॉर्वेमध्ये स्थायिक झाले पण त्यांच्या मनात कायम भारत होता. मनजीत बावा हे सुफी संगीताचे चाहते होते. कौटुंबिक समस्यांमुळे ते एकटे होते. अशावेळी सुफी चिजा गुणगुणत ते एकटे होत गेले. हुसेनसारखा चित्रकार आपल्या संघर्षाच्या काळात सायकलवर फिरून चित्रे विकत असे. याचीही माहिती या लेखात मिळते. अमृता शेरगील ही महत्वाची चित्रकर्ती. खुशवंत सिंग यांचा पत्नीबरोबर झाले झालेल्या भांडणाचा उल्लेख या लेखात आहे. गायतोंडे आणि हुसेन यांच्या भिन्न स्वभावांचा उल्लेख या लेखात आहे. पॉल क्ले, मार्क रॉथको या तत्वज्ञ चित्रकारांची अवतरणेही या लेखात आहेत.

कुलकर्णींना हे पुस्तक सुरुवातीला समजायला अतिशय अवघड वाटले.पण हळूहळू त्यांनी पुस्तकाची पकड घेतली आणि वाचक म्हणून एक समृद्ध अनुभव त्यांना मिळाला. हाच समृद्ध अनुभव हा लेख वाचून आपल्याला मिळेल याची आम्हाला खात्री आहे. अनेक जण किंमतीमुळे हे पुस्तक विकत घेऊ शकणार नाहीत, पण हा लेख वाचून हे पुस्तक वाचण्याची प्रेरणा नक्की मिळेल.

मुक्त संवाद दिवाळी अंक

(अंक खाजगी वितरणासाठी)

*****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.