News

एनआयडी प्रवेश प्रक्रिया सुरु

राष्ट्रीय डिझाईन संस्थान अर्थात एनआयडी या संस्थेच्या बॅचलर ऑफ डिझाईन (B.des)  आणि मास्टर्स ऑफ डिझाईन (M.des) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म संस्थेच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत. अहमदाबाद येथील ही डिझाइनक्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था आहे. विद्यार्थी बारावीनंतर बॅचलर्स ऑफ डिझाईन या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. मास्टर्स इन डिझाईन या कोर्ससाठी बीएफए आणि बॅचलर्स इन डिझाईन हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ही प्रवेश प्रक्रिया तीन स्तरावर होते. यात लेखी पेपर, स्टुडिओ टेस्ट आणि मुलाखत यांचा समावेश असतो. या सर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश मिळतो. बीएफए पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा करिअरचा उत्तम पर्याय आहे. इच्छूक विद्यार्थ्यांना संस्थेच्या वेबसाईटवर भेट देऊन फॉर्म भरता येईल.

NID च्या वेबसाईटची लिंक: https://www.nid.edu/getNewsevents/admissions-2023-24

टीप : येत्या K2PB या कार्यक्रमात एनआयडीचे माजी विद्यार्थी ऋषिकेश केदारे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी यूट्यूबवर प्रक्षेपित होईल. विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर आज संध्याकाळपर्यंत kanak.waikar@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.