News

रंगा येई वो मध्ये नितीन देसाई

नितीन देसाई हे नाव सगळ्याच चित्रपट आणि कलाप्रेमींना सुपरिचित आहे. हम दिल दे चुके सनम, जोधा अकबर यासारख्या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांचे कला दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जातात. शनिवार दिनांक १० सप्टेंबर रोजी दूरदर्शनच्या ‘रंगा येई वो ‘ कार्यक्रमात नितीन देसाई यांची मुलाखत घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी साडेपाच वाजता प्रसारित होणार असून पुनः प्रक्षेपण  ११ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता होईल.

नितीन देसाई हे जे जे स्कुल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत. बॉलिवूड चित्रपटांबरोबरच त्यांनी सलाम बॉम्बे,  सच अ लॉन्ग जर्नी या हॉलीवूडपटांसाठीही कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. बालगंधर्व या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. राजा शिवछत्रपती या गाजलेल्या टीव्ही सीरिअलचे निर्माता म्हणून नितीन देसाईंनी काम केलेले आहे. कर्जत येथे त्यांनी स्वतःचा एन डी स्टुडिओ हा ५२ एकरावर भव्य स्टुडिओ उभा केला आहे.
फिल्मफेअर, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यासारख्या मनाच्या पुरस्कारांचे नितीन देसाई मानकरी आहेत.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.