News

पीएनजी नाशिकमध्ये पंकज वानखेडे !

जळगाव येथील चित्रकार पंकज वानखेडे यांच्या निसर्गचित्रांचं  प्रदर्शन नाशिकच्या पीएनजी गॅलरीमध्ये दि 17 ते 31 मे 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं  उदघाटन नाशिकचे अप्पर आयुक्त निलेश सागर, चित्रकार प्रफुल्ल सावंत आणि संजय साबळे यांच्या हस्ते झालं. पंकज वानखेडे यांनी एटीडी आणि बीएफए ( पेंटिंग ) या विषयांमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याबरोबर त्यांनी शास्त्रीय संगीताचाही अभ्यास केला आहे. आत्तापर्यंत त्यांची चित्र प्रदर्शनं मुंबई, जळगाव आणि इतर शहरांमध्ये आयोजित झाली आहेत.
कला रसिकांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट दयावी असे आवाहन पंकज वानखेडे यांनी केलं आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी 10:30 ते संध्याकाळी 08:30 वाजेपर्यंत आहे. नाशिकची पीएनजी गॅलरी सोमवारी बंद राहील याची नोंद वाचकांनी घ्यावी.

प्रदर्शनाचा पत्ता :
पी.एन. गाडगीळ अँड सन्स लि.
पासपोर्ट कार्यालयाजवळ, स्टार झोन मॉल
शिखरेवाडी नाशिक रोड,
नाशिक 422214

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.