News

जहांगीरमध्ये पर्शराम सुतार…

चित्रकार पर्शराम सुतार यांचे ‘डिव्हाईन एक्सप्रेशन’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि 11 ते 17 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. पर्शराम सुतार यांचे चित्रकलेचे शिक्षण जेजे स्कूल ऑफ आर्ट इथून पूर्ण झाले आहे. पर्शराम आपल्या चित्रातून प्रामुख्याने भारतीय समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक परंपरांचे चित्रण कलात्मक पद्धतीने करतात. भारतातील असंख्य वारसा स्थळातील सौन्दर्य लेणे हा त्यांच्या चित्रांचा विषय असतो. भारतीय समाजात प्रचलित असलेल्या सांस्कृतिक, धार्मिक प्रतिकांना ते कॅनव्हासवर जिवंत करतात.
हे प्रदर्शन  रसिकांसाठी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 07:00 वाजेपर्यंत खुले राहील.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.