News

यात सहभागी व्हा आणि प्रत्येक अपडेट्स मिळवा !

कलाक्षेत्रातील विविध प्रश्नांसंदर्भात आम्ही जी अत्यंत सडेतोड अशी भूमिका घेतो आहोत तिच्यामुळे समाजमाध्यमांवर आम्हाला नव्या चित्रकारांचाच नाही तर नव्या नव्या कला रसिक आणि वाचकांचा देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला आहे. हा प्रतिसाद पोस्टना मिळणाऱ्या रिच,लाईक्स आणि कमेंट्समुळे आम्हाला सतत जाणवत राहतो. इतकंच नाही तर कला रसिकांना माहिती देण्यासाठी आम्ही जे एकतर्फी व्हाट्सअप ग्रुप चालवतो त्यात ज्या संख्येने कला रसिक आणि कलावंत सहभागी होत आहेत त्यावरुन देखील आम्हाला त्याची कल्पना येते.

१ एप्रिल पासून आम्ही वेबसाईटमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करत आहोत. कलाक्षेत्रासंबंधीची सर्वच माहिती आम्ही आता अधिक परिपूर्ण रीतीने देणार आहोत. त्याच बरोबर फीचर्स आणि बातम्या देखील नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यु ट्यूबवर प्रसारित होणाऱ्या व्हिडिओच्या प्रसारणाबाबत देखील तोच नियमितपणा पाळण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच बरोबर ‘चिन्ह’ आर्ट न्यूजचं इंग्रजी प्रसारण देखील याच महिन्यात आम्ही सुरु करणार आहोत.

ही पोस्ट वाचणाऱ्या सर्वच वाचकांना आमची नम्र विनंती आहे की, ‘चिन्ह’चे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया आमच्या पोस्ट आवडत असतील तर लाईक करायला, शेअर करायला, कमेंट्स करायला किंवा फॉलो करायला विसरु नका, कारण त्यामुळे आमचे अपडेट्स तुमच्या पर्यंत नियमितपणे येतील. जर तुम्ही समाजमाध्यमांचा नियमितपणे वापर करत नसाल तर सोबत दिलेल्या लिंकवरुन आमच्या ऍडमिन ओन्ली किंवा एकतर्फी व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. म्हणजे आम्ही देत असलेल्या बातम्या, विशेष लेख, यु ट्यूबवरचे व्हिडीओज आणि वेबसाईटवरचे अपडेट्स नियमितपणे तुमच्या मोबाईलवर येत राहतील. भारतीय चित्रकार आणि चित्रकला क्षेत्राविषयीचे प्रत्येक अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या संपर्कात आजपासूनच नव्हे तर आत्तापासूनच राहा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.