News

कातळशिल्प सहलीचे आयोजन

नवाश्मयुगीन माणसाने जांभा खडकावर म्हणजेच कातळावर जी चित्रे कोरली त्यालाच आपण ‘कातळशिल्प’ असे म्हणतो. कातळशिल्प जगात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका अशा मोजक्या ठिकाणीच आढळतात. भारतात मात्र ती कोकणात मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि याचंच भान राखून देवगड इतिहास संशोधन मंडळाने कातळशिल्प शोध मोहीम व ती सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना साथ म्हणून देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने कातळशिल्प सहलीचे आयोजन केले आहे
सहलीची रूपरेषा :
दिनांक 8 जानेवारी 2023 रविवार
सकाळी 8:00 वाजता देवगड स्टॅन्ड वरून सुरुवात होईल »
वाघोटन येथील कातळशिल्प व ऐतिहासिक वास्तू पाहून पुढे »
त्यानंतर बापर्डे येथे » वानिवडे » तळेबाजार » दाभोळे येथील पोखरबावं करून परत देवगडला येईल.
या पूर्ण सहलीत 15 ते 18 सुबक कातळ शिल्प पाहायला मिळतील
या कातळ शिल्प सहलीचे शुल्क 450₹ रुपये आकारण्यात आले आहे. यामध्ये प्रवास भाडे, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारी शाकाहारी जेवण समाविष्ट असेल. सहलीसाठी इच्छुक सर्वांनी आपली नावे श्री अजित टाककर ,मोबाईल नंबर -9689163017 यांच्याकडे नोंदवावी

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.