News

‘प्रयाण’ प्रदर्शन

मुंबईतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे तरुण चित्रकार आकाश खेतावत, सिद्धेश मोंडे, प्रतीक्षा जाधव यांचे ग्रुप  ‘प्रयाण’ हे चित्र प्रदर्शन सुरू आहे. हे प्रदर्शन 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान सुरू राहील.  प्रदर्शनाची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी सात आहे . प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार गणेश हिरे आणि मुंबई नेहरू सेंटरच्या संचालिका डॉक्टर नीना रेगे मॅडम यांच्या हस्ते झाले होते. हे तीनही तरुण चित्रकार जीडी आर्टचे विद्यार्थी आहेत. आकाश खेतावत यांची निसर्गचित्रे या प्रदर्शनात पाहता येतील. आकाश हे ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या ‘गच्चीवरील गप्पा’ या प्रसिद्ध यूट्यूब कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळत होते. सध्या ते जे के अकॅडमी ऑफ आर्टस् येथून पदविका शिक्षण घेत आहेत.
या प्रदर्शनाला भेट देऊन नवोदित कलाकारांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आकाश खेतावत यांनी केले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.