News

चित्रकार राज शिंगेंचा ‘चौकार’ !

चित्रकार राज शिंगे हे शब्दातून देखील खूप छान पद्धतीने व्यक्त होतात. फेसबुकवरचं त्यांचं लिखाण कला वर्तुळातच नव्हे तर कलाप्रेमी वाचकांकडून देखील मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं. फेसबुकवरच्या पोस्टना मिळणारा लाईक्स, शेयरचा प्रतिसादच आपल्याला त्या विषयी सांगून जातो. हे लिखाण वाचल्यावर राज शिंगे यांना अनेक वाचकांनी प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवरून पुस्तक प्रकाशित करण्याचा आग्रह धरला. बहुदा राज यांनी ते मनावर घेतलं असावं. कारण लवकरच त्यांची एक नाही दोन नाही तर चार पुस्तकं एकाचवेळी प्रकाशित होणार आहेत. त्या पुस्तकासाठी त्यांनी अभिनव प्रसार तंत्राचा वापर केला आहे. अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांची ती पोस्ट फिरते आहे. त्या पोस्टमध्ये ते म्हणतात, 

“नमस्कार…
(१) ‘काडी’- हा कवितासंग्रह (२) ‘शांतिनिकेतन’- कलात्मक अनुभव आणि प्रवास (३) ‘सोरट’- ललित गद्य – जगण्याचे अंतरंग (४) ‘झोरीचा आणि सर्बिया’- कलात्मक सहप्रवास
ही चारही पुस्तकं एका संचाच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. ही निव्वळ पुस्तकं नाहीत तर, ह्या चारही पुस्तकात जगण्याची स्पंदनं आहेत. ‘काडी’ या कविता संग्रहातून मी रंगांऐवजी शब्दांतून व्यक्त झालो आहे. ‘शांतिनिकेतन’ या प्रवासात कलात्मक अनुभवातून, निसर्गातून मी आणि माणिकने जगताना घेतलेले अनुभव शेयर केले आहेत. ‘सोरट’ हे पुस्तक तुम्हाला स्थळ, काळाचं दर्शन घडवत असंख्य माणसांची पानापानांतून भेट घडवत जातील. ‘झोरीचा आणि सर्बिया’ या पुस्तकात कलावंत सर्बियन मैत्रीण झोरीचा बरोबरचा कलात्मक सहवास उलगडला आहे. डेन्यूब नदीच्या सहवासात निसर्ग, भेटलेली माणसे, परिसर यात प्रत्येक पान उलगडताना तुम्ही सर्व या पुस्तकात आमच्याबरोबर सर्बियात वावरता आहात हा अनुभव येईल. 
या चारही पुस्तकांचा एकत्रित नजराणा रसिक वाचकांना मिळावा या आनंदासाठी हा चौफुला लवकरच आपल्या भेटीला येत आहे. या चारही पुस्तकांच्या निर्मितीचे मी आणि माणिक एकत्रित धाडस करतोय. महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, देशात, विदेशात आतापर्यंत माझ्या लेखन, काव्य, विचारांना आपण सर्व दाद देत आलात. ही चारही पुस्तके आपल्या संग्रही असावीत या भावनेने ह्या पुस्तकांचा संच आपल्यासमोर गुढीपाडवा म्हणजेच आमच्या लग्नाच्या वाढदिवशी नोंदणी सुरू करीत आहोत. ही चारही पुस्तके “सृजनसंवाद प्रकाशन”, ठाणे यांच्याकडून प्रकाशित होत असून त्यांचे संपादन कविमित्र गीतेश गजानन शिंदे यांनी अथक परिश्रमाने केलेले आहे. हा संच आम्ही स्वखर्चाने छापून आपल्यासाठी देत असल्यामुळे संच मर्यादित आहेत. या संपूर्ण संचाचे मूल्य ₹१२५० असून प्रकाशनपूर्व सवलतीत पोस्टेज खर्चासह हा संच आपल्याला ₹१०००/- थेट घरपोच मिळणार आहे. संच मर्यादित असल्याने आपले नाव, पिनकोड सहित संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर तसेच किती संच हवे आहेत, ही सर्व माहिती माझ्या 99676 79110 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी.”

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.