News

ट्रायडंट मध्ये रुपाली ठोंबरे

चित्रकार रुपाली ठोंबरे यांचं ‘डॉट टू डॉट’ हे चित्र प्रदर्शन ट्रायडंट आर्ट गॅलरी येथे दि 01 ते 07 मे 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. या विश्वातली प्रत्येक उत्पत्ती ही एका बिंदूपासून झालेली आहे मग तो बिंदू गर्भाच्या मूळ अस्तित्वाइतका सूक्ष्म असू शकतो किंवा सुर्याइतका प्रचंड. आणि त्या जन्मापासूनच सुरु होतो एक प्रवास ज्याला आपण जीवन म्हणतो. त्या प्रवासात जे जे दिसतं ते या आकारातून आपल्याला पाहायला मिळतं. वारंवार पाहता केवळ रंगहीन वाटणारा गोळा जेव्हा प्रयत्नांच्या आवर्तनांनी तडकतो तेव्हा त्यातून रंगाचं कारंजे दृष्टीस पडतं. आता त्या बिंदुला… वर्तुळाला… गोलाला एक नवं आयुष्य प्राप्त होतं. एक नवा अर्थ निर्माण होतो. अशाच अदृश्य भावनांच दृश्यरूप म्हणजे रुपाली यांची चित्रं आणि असा हा अशक्य वाटणाऱ्या रंगहीन बिंदूचा उच्च स्थळी पोहोचलेल्या , रंगांत भिजून आनंदाने चिंब झालेल्या गोलाचा प्रवास आहे … डॉट टू डॉट.

रुपाली ठोंबरे या सुलेखनकार अच्युत पालव यांच्या विद्यार्थिनी आहेत. हे प्रदर्शन रसिकांसाठी सकाळी 09:00 ते संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत खुले असेल. विशेष म्हणजे ‘चिन्ह ऑनलाईन आर्ट गॅलरी’मध्येही तुम्ही हे प्रदर्शन पाहू शकता आणि चित्रांचा आस्वाद घेऊ शकता. खालील लिंकवर क्लिक करून हे प्रदर्शन आवर्जून पहा.

DOT TO DOT

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.