News

चंद्रमोहन कुलकर्णी यांना सत्यजीत रे पुरस्कार जाहीर

बलराज साहनी-साहीर लुधियानवी फाऊंडेशनने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सत्यजीत रे यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांना सत्यजीत रे पुरस्कार जाहीर केला आहे.
येत्या २१ तारखेला संध्याकाळी ५.३० वाजता भारत इतिहास परिषद, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि फिल्म सिटीचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते चंद्रमोहन कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सत्यजीत रे यांचे नाव घेतल्याशिवाय भारतीय चित्रपटांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. प्रतिभेच्या जोरावर जागतिक चित्रपट विश्वाच्या पटलावरही रे यांनी लक्षणिय प्रभाव टाकला आहे. दिग्दर्शनाबरोबरच रे यांनी कथाकार, कंपोजर आणि पेंटर म्हणून देखील  यांनी नावलौकीक कमावला होता.
कलेला मानवी जीवनाशी जोडून आणि मानवी स्वभावाशी सुसंगत अशी जीवनाची सुंदर चित्रे रेखाटून चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या चित्रांना राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. कॉपीराइटिंगपासून, सुलेखनकला, मुद्राक्षरकला, संपादकीय कला (एडिटोरिअल आर्ट), आरेखन कला (ग्रफिक आर्ट), संगणकीय आरेखन (डिजिटल ग्रफिक्स), छायाचित्रणापासून ते शिल्पकला, चित्रकलेपर्यंत सर्वच क्षेत्रांत त्यांना आत्मीयता आणि अभिरुची आहे. त्यामुळे त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहीती बलराज साहनी-साहीर लुधियानवी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश टिळ्ळेकर यांनी दिली.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.