News

छत्रपती संभाजीनगर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा

आज दि २७ मार्च रोजी शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरुद्ध मोर्चा काढला आहे अशी माहिती समजते. उद्यापासून विद्यार्थ्यांच्या वार्षिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, पण त्याची कुठलीच तयारी अजून केलेली नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी काही प्रश्नाचे फलक टांगले आहेत. त्यांचे फोटोच इथे पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांशी बोलल्यावर कळते की विद्यार्थी प्रचंड रोषात आहेत आणि महाविद्यालयाची घडी विस्कळीत आहे. विद्यार्थी हे सकाळपासूनच महाविद्यालयाच्या गेटसमोर बसून आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.

अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे कळते की, हा मोर्चा टेक्सटाईल विभागाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. पण घटना अशी घडली की महाविद्यालयाची वेळ ही सकाळी १०:३० वाजता असताना पण कर्मचारी उशिरा आल्याने त्याने गेट एक तास उशिरा म्हणजे तब्बल ११:३० वाजता उघडले. त्यामुळे वसर्वच विद्यार्थी चिडले आणि सगळ्या विभागाचे विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले.

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ धरणं धरून बसलेले विद्यार्थी.

उद्यापासून महाविद्यालयाचे वार्षिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे पण अजून निमंत्रण पत्रिकाही तयार नाहीत. महाविद्यालय कुठल्याही तयारीत नसल्याने वार्षिक प्रदर्शनाचा फियास्को होण्याची शक्यता जास्त आहे. यात आता विद्यार्थी मूलभूत मागणीसाठी मोर्चा काढत आहेत अशा परिस्थितीत प्रदर्शन कसे होणार हा प्रश्न कला वर्तुळाला पडला आहे.

कला संचालनालय मात्र नेहमीप्रमाणेच या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आहे असेच दिसते. छत्रपती संभाजीनगर महाविद्यालयाच्या वस्त्रकला विभागाकडे सध्या मूलभूत सोयीही नाहीत. विद्यार्थीनींसाठी टॉयलेटची व्यवस्था नाही. पण याची कुठलीच दखल ना उच्च शिक्षण खातं घेत आहे ना कला संचालनालय. वरती ज्या फलकाचे फोटो दिले आहेत ते अगदी मूलभूत प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे, पण शासन वर्षानुवर्षे याची दखलच घेणार नसेल तर मग कला शिक्षणाचं भविष्य अंधारात आहे. या महत्वाच्या संस्था जर सरकारला चालवता येत नसतील मराठवाड्यासारख्या मागास भागातून मोठ्या आशेने कला शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी जायचं कुठं?

चिन्हचा विद्यार्थ्यांच्या या मोर्चाला खंबीर पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांना जर आपले मनोगत ‘चिन्ह’पर्यंत पोहोचवायचे असेल तर त्यांनी +91 90040 34903 या क्रमांकावर संपर्क साधावा.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.