News

आंतराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन २०२२

इंटरनेटवर दर्जेदार आणि कलात्मक छायाचित्रांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘द आर्ट’ /या ग्रीसमधील संस्थेकडून  दरवर्षी  आंतरराष्ट्रीय फोटो स्पर्धेचे आयोजन केले जाते. आर्ट ऑफ सोशल मीडिया प्रदर्शन या वर्षात आत्तापर्यंत तिसऱ्यांदा भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनासाठी ऍबस्ट्रॅक्ट,ब्लॅक ऍड व्हाइट, लॅंडस्केप, मोबाईल फोटोग्राफी, नेचर, फोटो सिरिज, पोर्ट्रेट, स्टोरी टेलिंग, स्ट्रीट फोटोग्राफी आणि ट्रॅव्हल या दहा फोटो श्रेणींमध्ये स्पर्धा घेतली जाते. यामधुन परिक्षकांकडून प्रत्येक श्रेणीतून सर्वोत्तम १० फोटो निवडले जातात. हे निवडक फोटो नंतर प्रदर्शनात मांडले जातात. नुकतीच भारतीय व्हिज्युअल फोटोग्राफर गुरदिप धिमन यांची छायाचित्रे या प्रदर्शनासाठी निवडण्यात आली आहेत. यामुळेच आता विविध सोशल मिडिया माध्यमांवर उत्तमोत्तम फोटोग्राफ्स अपलोड करण्याऱ्या कॅमेराप्रेमी लोकांसाठी आपली ही कला जगासमोर आणण्याची एक नवी संधी या प्रदर्शनाद्वारे उपलब्ध झाली आहे असे म्हणता येईल. २०२० पासून या प्रकारचे प्रदर्शन भरवले जात असून पुढील वर्षाच्या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल.
या उपक्रमाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर असलेला व्हिडीओ पाहा.
https://www.theartofsocialmedia.gr/en

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.