News

गोव्यात फिरते वाचनालय

सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिवल अंतर्गत १५ डिसेंबर २०२२ ते २३ मे २०२३ दरम्यान फिरत्या पुस्तक वाचनालयाचे आयोजन केले आहे. या वाचनालयामध्ये चित्रकारांसाठी उपयुक्त अशा कादंबरी, कविता संग्रह, क्लासिक्स इ. पुस्तकांचा समावेश असेल. या वाचनालयामध्ये चित्रकारांच्या कार्यशाळेचाही समावेश असेल. फिरत्या वाचनालयाची संकल्पना सर्वप्रथम हॉंगकॉंग येथे अस्तित्वात आली होती. त्यानंतर आता गोवा येथील सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिवलमध्ये ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
अधिकाधिक कला रसिकांनी या वाचनालयाचा लाभ घेण्याचे आवाहन सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिवलतर्फे करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचा पत्ता :
ओल्ड जीएमसी कॉम्प्लेक्स, FRXC+J7V, पणजी, गोवा- 403001

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.