News

नवी मुंबईत छत्री रंगवा कार्यशाळा !

या पावसाळ्यात स्वतःच्या हाताने रंगवलेली छत्री वापरायला आवडेल का ? मग ही कार्यशाळा तुमच्यासाठीच आहे. प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव ‘अच्युत पालवज् स्कूल ऑफ कॅलिग्राफी’तर्फे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबईत छत्री रंगवा कार्यशाळा घेणार आहेत. ही कार्यशाळा रविवार दि. ५ जून २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता नवी मुंबईतल्या बेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना छत्री, रंग, ब्रश आणि नाश्ता पुरवण्यात येणार असून या कार्यशाळेची फी रु. १७५० इतकी आहे. अधिक माहितीसाठी ७४००३ ७२४३० या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.