News

विनिता चेंडवणकर यांचे प्रदर्शन

गोवा येथील चित्रकार विनिता चेंडवणकर यांचे ‘ब्लिसफुल जर्नी थ्रो फँटसी’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि ०७ ते १३ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार श्रीकांत जाधव यांच्या हस्ते झाले. निसर्ग, अद्भुतता, रंग यांचा सुरेख संगम विनिता यांच्या चित्रात अढळतो. वारली आणि मधुबनी या लोककलांचा प्रभाव विनिता यांच्या चित्रावर आहे. विनिता यांच्या चित्रांचा आस्वाद घेण्यासाठी कुठल्याही बौद्धिक कसरतीची गरज नसते कारण तिची चित्रे अद्भुत रसाने ओथंबलेली असतात.
विनिता यांनी आपले बीएफए चे शिक्षण गोवा फाईन आर्ट कॉलेजमधून पूर्ण केले आहे. त्यांनी देशभरातील अनेक प्रदर्शनामध्ये भाग घेतला आहे.

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.