News

व्हिज्युअल मेलडी अंकात चित्रकार माजगावकर !

रवी परांजपे फाउंडेशन फॉर आर्ट या पुण्याच्या संस्थेतर्फे ‘Visual Melody‘ या नावाचे एक इ-मॅगझीन दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध केले जाते. या उपक्रमाला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. यंदाच्या दुसऱ्या अंकात कोल्हापूरचे नामवंत चित्रकार जी.एस. माजगावकर यांच्यावर एक विशेष लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोल्हापूरच्याच सौ. हेमा राजगोपाळ द्रविड यांनी लिहिलेल्या ‘माजगावकरांची निसर्गसौंदर्य भाषा’ या प्रदीर्घ लेखात माजगावकरांच्या आजवरच्या कर्तृत्वाचा अतिशय सुरेख पद्धतीने आढावा घेण्यात आला आहे. या लेखाचा ऍडव्होकेट अमित द्रविड यांनी केलेला इंग्रजी अनुवाद देखील याच अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

हा अंक मिळवण्यासाठी https://raviparanjape.org/ येथे संपर्क करावा. 

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.