News

जहांगीरमध्ये ‘वारसा’ !

चित्रकार आणि संयोजक भास्कर सगर यांनी संयोजित केलेल्या ‘वारसा’ या प्रदर्शनाचं आयोजन दि 30 मे ते 05 जून 2023 दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी येथे करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उदघाटन मंगळवार दि 30 मे 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता गॅलरी क्रमांक 2 येथे होईल.

या प्रदर्शनाचं उदघाटन महाजेनकोचे संचालक (वित्त) श्री आणि श्रीमती बाळासाहेब थिटे आणि जहांगीर आर्ट गॅलरीच्या सचिव श्रीमती के.जी. मेनन यांच्या हस्ते होईल.

भास्कर सगर यांच्या ‘वारसा’ या प्रदर्शनात मिक्स मीडिया, चित्रं, शिल्प या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा प्रदर्शित करण्यात येत आहे.

प्रदर्शनाची वेळ सकाळी 11:00 ते संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क 9822012349

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.