News

साबळे साहेब गेले कुठे  ?

कालपासून  मुंबईतल्या  यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘कसोटी विवेकाची’ हे प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन नामवंत अभिनेते  नसिरुद्दीन शहा यांच्या हस्ते झाले. दाभोलकरांच्या पत्नी शैला दाभोलकर आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्चे अधिष्ठाता साबळे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अर्थात हा कार्यक्रम जेजेच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा असल्याने तिथे डीन साबळे यांची उपस्थिती अपेक्षितच होती. पण डीन साबळे या कार्यक्रमाला आलेच नाहीत  किंवा त्यांच्यावतीने बोलावयास कुणीही जबाबदार शिक्षकदेखील उपस्थित राहिले नाहीत .

बातमीसोबतच्या फोटोतील रिकामी खुर्ची खूप काही सांगते . नसिरुद्दीन शहा सारख्या कला क्षेत्रात प्रतिष्ठेचे नाव असलेल्या  व्यक्तीला जेव्हा कार्यक्रमाच्या उद्घाटनाला बोलावले जाते तेव्हा  निमंत्रण स्वीकारलेल्या जेजेच्या डीन साहेबांनी तेथे उपस्थित राहणे अत्यंत अत्यावश्यक होते.  हा जेजेसारख्या संस्थेच्या  प्रतिष्ठेचा प्रश्न होता. पण डीन साहेब मात्र बेजबाबदारपणे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले, कुठलेही कारण न देता.  अशा कुठल्या महत्वाच्या कार्यक्रमात डीन  साहेब व्यस्त होते की त्यांना जेजेच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीच्या प्रदर्शनास देखील  उपस्थित राहता आले नाही असा प्रश्न कलावर्तुळातून विचारला जात आहे.

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.