News

म्हणे डिनोव्होमुळे फी वाढणार !

ही बातमी आहे १८ वर्षांपूर्वीची . लोकसत्ता या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली . जे जे स्कूल ऑफ आर्ट मधली एकेक सीट प्रत्येकी एक एक लाखाला विकली गेली तेव्हाची . त्या वेळी ‘चिन्ह’नंच पुढाकार घेऊन हा सारा गैरप्रकार उघडकीला आणला होता . बातमी प्रसिद्ध होताच सारी सूत्रं हलू लागली. नेहेमी होते तेच याही वेळी झाले , कारवाई अर्थातच कुणावर झाली नाही कारण ज्यांनी कारवाई करायची तेच या कटाचे सूत्रधार होते, आणि मंत्रालयात शांतपणे बसले होते. पण एक मात्र झालं  या बातमीमुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आली . आणि नंतर तर सीईटीच लागू झाली.

जेजेचे आताचे कारभारी तेव्हा नुकतेच रुजू झाले होते . पण त्यांना मात्र तेव्हा या गैरकारभाराविरोधात तोंड उघडावंसं काही वाटलं नाही . साधा तोंड देखला निषेध तरी करावयाचा पण तो देखील केला नाही . आज हे सारे डिनोव्होच्या विरोधात फी वाढणार , फी वाढणार म्हणून आक्रंदन करतायत , विद्यार्थ्यांजवळ गळे काढतायत त्यांनी तेव्हा का नाही या भयंकर अशा खाजगी फी वाढीला विरोध केला ? आहे या प्रश्नाचं त्यांच्यापाशी उत्तर ?ज्यांनी हे सारं केलं , जेजेच्या प्रतिष्टेला काळिमा फासला त्यांच्याच बरोबर एकाच टॅक्सीतून  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इमारतीत मुलाखतीला कोण गेलं होतं ते आम्हाला ठाऊक नाही असं  वाटलं का ?

हिंमत असेल तर या प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग डिनोव्होच्या विरोधात गळे काढा !   

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.