News

नाशिक कलानिकेतन पदाधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार

नाशिक कलानिकेतन या नाशिकमधल्या जुन्या कला संस्थेतील वादाची चिन्हे हटण्याचं नाव घेत नाहीयेत. मागील बातमीमध्ये आम्ही कार्यकारणीतील पदाधिकारी आणि सदस्य यांच्यामधील वादाची बातमी दिली होती. या बैठकीत सदस्यांनी पदाधिकाऱ्यांना हिशोब आणि इतर कागदपत्रांची मागणी केली होती पण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ती अजूनही सदस्यांना दिली नाहीत असे समजते.

बाळ नगरकर यांचे निवेदन.

संस्थेचे एक सदस्य बाळ नगरकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराचा जाहीर निषेध केला आहे. बाळ नगरकर यांनी असा आरोप केला आहे की, संस्थेचे माजी सचिव कला तपस्वी शिवाजी तुपे यांचा रघुनाथ कुलकर्णी यांनी मानसिक छळ केला होता आणि तुपे यांच्याकडून जबरदस्तीने राजीनामा घेऊन ते संस्थेच्या सचिव पदावर अनधिकृतरित्या आले आहेत.

या घटनेनंतर नाशिक कलानिकेतन मध्ये भोंगळ कारभार सुरु झाला. धर्मादाय आयुक्तांची कुठलीही परवानगी न घेता रघुनाथ कुलकर्णी यांनी कार्यकारणीत स्वतःच्या मर्जीनुसार फेरबदल केले. आयुक्तांची परवानगी नसताना रघुनाथ कुलकर्णी हे स्वयंघोषित अध्यक्षही झाले आणि आपल्या सोयीच्या लोकांना त्यांनी कार्यकारिणीमध्ये सहभागी करून घेतले.

संस्थेच्या घटनेनुसार संस्थेची वार्षिक सभा घेणे अनिवार्य असतानाही अनेक वर्षांपासून अशी वार्षिक सभा घेण्यात अली नाहीये. कला क्षेत्रातील मान्यवर, कला रसिक, चित्रकार, कला शिक्षक, कला विद्यार्थी यांना कार्यकारणीमध्ये सामाविष्ट करून घेतले नाहीये. तब्बल २०-२२ वर्षानंतर रघुनाथ कुलकर्णी यांनी आपल्या मनाने ठरवलेली कार्यकारणी धर्मादाय आयुक्तांकडून मान्य करून घेण्यासाठी दि २५ ऑक्टोबर २०२१ रोजी अर्ज केला आहे. याविरोधात कैलास पगारे यांनी कोर्टाकडे पर्यायी कार्यकारिणीसाठी विचारणा केली आहे. यासाठी नाशिक कलानिकेतन कार्यकारणी सदस्यांची यादी आवश्यक असल्याने संस्थेचे सभासद बाळ नगरकर यांनी तशी मागणी संस्थेचे अनधिकृत अध्यक्ष रघुनाथ कुलकर्णी आणि अनधिकृत सचिव दिनकर माळी यांच्याकडे केली असता त्यांनी टाळाटाळ केल्याचे समजते.

संस्थेचे लिपिक ओंकार चौधरी यांच्याकडून ही यादी मिळेल असे अध्यक्ष आणि सचिव सांगतात मात्र दिनकर जानमाळी कामानिमित्त गावाला गेले असल्याने ही यादी देणे शक्य नाही असे उत्तर लिपिक चौधरी यांनी बाळ नगरकर यांना दिले. अशा प्रकारे यादी देण्यास टाळाटाळ करून संस्थेचे ज्येष्ठ सभासद व माजी प्राचार्य बाळ नगरकर यांचा वेळोवेळी अपमान करण्यात येत आहे. कलामहर्षी वासुदेव कुलकर्णी यांनी नाशिक कला निकेतन ही संस्था मोठ्या कष्टाने नावारूपाला आणली. पण अशा प्रकारे मनमानी कारभार करून संस्थेचे विद्यमान पदाधिकारी संस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत असा आरोप नाशिक कला वर्तुळातून केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर संस्थेचे सभासद बाळ नगरकरांनी संस्थेच्या सर्व सभासदांनी एकत्र येऊन तातडीची बैठक घ्यावी व संस्थेला या अनागोंदीतून वाचवावे असे आवाहन केले आहे.

****

(फिचर इमेजमध्ये ज्येष्ठ प्राचार्य/सभासद प्रा. बाळ नगरकर व चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल चव्हाण, कला निकेतनचे लिपिक ओंकार चौधरी यांना निवेदन देताना.)

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.