News

यज्ञेश शिरवडकर यांचे चित्र प्रदर्शन

चित्रकार यज्ञेश शिरवडकर ह्यांच्या नवनिर्मित चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगिर कलादालन येथे १८ ते २४ ऑक्टोबर २०२२ ह्या कालावधीत आयोजित केले आहे. प्रस्तुत चित्रप्रदर्शनात चित्रकाराने ॲक्रीलिक रंगाच्या कलात्मक लेपनातून साकारलेली विविधलक्षी अनोखी चित्रे मानवी आयुष्यातील संगीताचे व तशा प्रकारच्या नादब्रह्माचा असणारे अढळ स्थान एका अभूतपूर्व शैलीतील सौंदर्यपूर्ण सादरीकरणातून स्पष्टपणे अधोरेखित करतात.

यज्ञेश शिरवडकर ह्यांचे कलाशिक्षण BVA पर्यंत M.S.विद्यापीठ वडोदरा येथे झाले. त्यानंतर त्यांचे उर्वरित कलाशिक्षण सिडनी, ऑस्ट्रेलिया येथील युनिव्हरसिटी ऑफ साऊथ वेल्स येथे ग्रॅज्युट डिप्लोमा इन आर्ट (प्रिंट मेकिंग) आणि मास्टर ऑफ आर्टस् (पेंटिंग) पर्यंत झाले. नंतर त्यांनी मुंबई, अहमदाबाद, रत्नागिरी, सिडनी वगैरे बऱ्याच ठिकाणी नामांकित कलादालनातून व कलाविषयक उपक्रमातून आपला चित्रे सादर केली आहेत.

प्रस्तुत चित्रप्रदर्शनातील चित्रे प्रामुख्याने मानवी जीवनात असणारे संगीताचे अढळ स्थान व त्यापासून त्यास होणारा दैवी सुखाचा, शांतीचा व स्वर्गतुल्य अमृतमय आनंदाचा एक बोलका आविष्कार फार प्रकर्षाने दर्शवितात. मानवी मनास हल्लीच्या धावपळीच्या व गतिमान तसेच व्याधीयुक्त जीवनातील विविध ताणतणाव व मनोवेदना वाढविणारी मनस्थिती ह्यांचा वारंवार अनुभव येत असतो. ह्या पासून मुक्ती मिळण्यासाठी व निरामय सुखी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी संगीत त्याला योग्य प्रकारे सहाय्य/मदत करते. तसेच अनेक शारीरिक व मानसिक व्याधींवर व विकारांवर आणि आजारांवर उपचार म्हणूनसुद्धा बऱ्याचदा संगीतोपचारांचा (musical therapy ) डॉक्टर्ससुद्धा उपयोग करतात व रुग्णास व्याधीमुक्त करण्याचा प्रयत्न करतात. ॲक्रीलिकरंगांच्या कलात्मक व सौंदर्यपूर्ण लेपनातून त्यांनी रंगांचे विविध स्तर आणि त्यातून साकारणारी आश्वासक अनुभूती ह्यांचे एक बोलके चित्रमय दर्शन सर्वांना येथे घडविले आहे.

प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. अधिकाधिक कला रसिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन यज्ञेश शिरवडकर यांनी केले आहे.

प्रदर्शनाचा पत्ता :
जहांगिर कलादालन, काळा घोडा, महात्मा गांधी मार्ग, मुंबई ४०० ००१

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.